शुभम द्विवेदी यांना हुतात्मा घोषित करा   

पत्नी अशन्या यांची मागणी

कानपूर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले शुभम द्विवेदी यांना हुतात्मा घोषित करावे, अशी मागणी त्यांच्या पत्नी अशन्या यांनी केली. शुभम यांनी हिंदू धर्मीय म्हणून बलिदान दिले. त्यामुळे अन्य जणांचे प्राण वाचले होते. त्यामुळे त्यांना हुतात्मा घोषित करावे. पहिली गोळी शुभम यांच्यावर दहशतावाद्यांनी झाडली होती. 
 
यानंतर काही काळ दहशतवादी विचारत होते की, तुम्ही हिंदू की मुस्लिम आहात. त्यात वेळ गेला आणि अन्य पर्यटकांना पळून जाण्यास मदत मिळाली. पर्यायाने त्यांचा जीव वाचला. सरकारने केवळ शुभम यांना हुतात्मा घोषित करावे. त्याशिवाय मला सरकारकडून आणखी काही एक नको आहे, असे अशन्या यांनी सांगितले.
 
दरम्यान, शुभम हे कानपूरचे व्यावसायिक होते.  त्यांनी अशन्या यांच्याबरोबर १२ फेब्रुवारी रोजी विवाह केला होता. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात त्यांचा अन्य २६ जणांबरोबर मृत्यू झाला होता. गुरुवारी शुभम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

Related Articles